आता काय करावं ब्वा ! कपडे न घालताच जगभर फिरताहेत हे नवरा – बायको ; नीट वाचा आणि कारण जाणून घ्या ! 

spot_img

आता काय करावं ब्वा ! कपडे न घालताच जगभर फिरताहेत हे नवरा – बायको ; नीट वाचा आणि कारण जाणून घ्या ! 

यूके अर्थात युनायटेड किंगडममध्ये राहणारी फियोना आणि तिचा नवरा माइकल डिस्कॉम हे वयाच्या पन्नाशीतलं कपल जगभर फिरत आहे. आतापर्यंत त्यांनी फिरण्यात तब्बल 18 हजार डॉलर्स म्हणजे 15 लाख रुपये खर्च केले आहेत. या कपलला फिरायला आवडतं. पण अशा ठिकाणी, जिथं विनाकपडे त्यांना फिरता येईल. अशा ठिकाणांचा शोध घेऊन हे कपल तिथं जातं. यामागील कारणही इंटरेस्टिंग आहे.

या कपलचा विनाकपडे जगभर फिरण्याचा संबंध हनीमूनशी आहे. 20 वर्षांपूर्वी हे कपल हनीमूनसाठी ग्रीसला गेलं होतं. तिथं त्यांनी खूप मजा केली. आपले सर्व कपडे काढून निर्वस्त्र होत त्यांनी आपलं फोटोशूटही केलं.

तेव्हापासून या कपलचं असंच सुरू आहे. म्हणजे ते वेगवेगळ्या देशात जातात, तिथं विनाकपडे फिरतात, फोटो काढतात आणि सोशलमिडियावर पोस्ट करतात. त्यांची न्यूड ट्रॅव्हलशी संबंधित एक वेबसाईटही आहे.

त्यांच्या हनीमूनबाबत फियोना म्हणाली, ‘मला आठवतंय ग्रीसच्या छोट्याशाच्या खाडीत एका कपलशिवाय दुसरं कुणीच नव्हतं.

ते कपल निर्वस्त्र होतं. आम्ही त्यांना तसं पाहिलं आणि आम्हा दोघांनाही धक्का बसला. तेव्हा पहिल्यांदाच मला कसं वाटलं माहिती नाही. पण ते खूपच सुंदर होतं’.

समुद्रकिनारी धावताना दोघांनीही आपले कपडे काढले त्यानंतर त्यांना स्वतंत्र झाल्यासारखं वाटलं. कपल म्हणालं, तरुण वयात त्यांना त्यांच्या शरीराबाबत खूप लाज वाटायची. फियोना आपलं मोठं शरीर झाकण्यासाठी मोठ्या आकाराचे कपडे घालायची. पण आता ते विनाकपडे आपल्या शरीरावर प्रेम करू शकले. आम्हाला आयुष्यात पहिल्यांदा स्वतंत्र झाल्यासारखं वाटलं.

अखेर आम्ही आमच्या शरीररचनेचा स्वीकार केला. लोक आमच्याबाबत काय विचार करतील, याचा विचार करणं आम्ही सोडलंय. खूप मोकळं वाटत होतं, मोकळ्या शरीरावर सर्वकाही जाणवत होतं. तेव्हापासून आम्हाला असंच राहवंसं वाटलं.

फियोना म्हणते, तापमान वाढतं, तेव्हा आम्ही घरातही कपडे काढतो आणि नेहमी कपड्यांशिवायच राहतो. यासारखं दुसरं चांगलं काहीच नाही. या कपलला लोकांच्या बऱ्याच टिकेचाही सामना करावा लागतो पण तरी असंच फिरण्याचं त्यांनी ठरवलं आहे. ‘आम्हाला शक्य तितक्या अशा नैसर्गिक ठिकाणी आम्ही जाणार. या यादीत थायलँड आणि ग्रीनलँडही आहे’, असंही त्यांनी सांगितलंय.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :