हल्लीचा प्रचंड उकाडा प्रत्येकाला असह्य झाला आहे. त्यामुळे कुठे तरी थंड हवेच्या ठिकाणी जावं असं प्रत्येकाला वाटत आहे. मात्र कुठे जावं ते आपल्याला परडेल का खर्च किती येईल असा विचार प्रत्येक जण करत आहे परंतु तुमच्या खिशाला परवडणारी अशी पर्यटनासाठीची ठिकाणं आम्ही आता तुम्हाला सांगणार आहोत. यामुळे तुम्ही तुमच्या बजेटमध्ये पर्यटन करू शकणार आहात…
उन्हाळ्यामध्ये थंड हवेचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही अलेप्पी या भारतातील सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळाला भेट देऊ शकता. अलेप्पी हे एक दक्षिण भारतातील सुंदर पर्यटन स्थळ आहे. अलेप्पीमध्ये हिरवळ, नैसर्गिक सौंदर्य, बॅकवॉटर, बोट मुक्काम, कॅम्पिंग इत्यादींचा आनंद घेऊ शकता.
तुम्ही या ठिकाणी मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत या ठिकाणाला भेट देऊ शकता. अलेप्पी ला भेट देण्यासाठी प्रति व्यक्ती तुम्हाला 8 ते 10 हजार खर्च येऊ शकतो. त्यामुळे कमी बजेटमधील हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे.
गोव्याला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. या ठिकाणी समुद्र किनारा आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी अनेकजण गोव्याला भेट देत असतात. उत्कृष्ट आर्किटेक्चर, किल्ले, स्थानिक बाजारपेठ, वॉटर फॉल्स, समुद्रकिनारे आणि आनंददायी वातावरणासह गोव्याच्या सहलीसाठी तुम्ही प्रति व्यक्ती 7 ते 8 हजारांच्या बजेटमध्ये जाऊ शकता.
प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी तुम्ही स्वस्त आणि मस्त ऋषिकेश या पर्यटन स्थळाला भेट देऊ शकता. उत्तराखंडमध्ये उन्हाळ्यात थंड वातावरण असते. या ठिकाणी तुम्ही गंगेच्या काठावर बसून नेत्रदीपक आणि आरामदायी सूर्यास्त पाहू शकता. ऋषिकेशच्या सुंदर दऱ्या, स्वादिष्ट खाद्यपदार्थ, रोमांचक उपक्रम या ठिकाणी अनुभवू शकता. या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला 5 ते 7 हजार खर्च येऊ शकतो.
निसर्गाच्या प्रतिबिंबात हिंडायचे असेल तर दार्जिलिंग हे खूप चांगले सुंदर पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी तुम्हाला हिरवेगार चहाचे मळे पाहायला मिळतील. तसेच इतर पर्यटन स्थळांचा देखील तुम्ही आनंद घेऊ शकता. या ठिकाणी जाण्यसाठी तुम्हाला सुमारे 8 ते 10 हजार खर्च येईल.