… आणि लिटिल मास्टर सुनील गावस्करने घेतली ‘या’ क्रिकेटरची कार्यशाळा… ! 

spot_img

… आणि लिटिल मास्टर सुनील गावस्करने घेतली ‘या’ क्रिकेटरची कार्यशाळा… ! 

आयपीएल २०२३ मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघात अप्रतिम कामगिरी करणाऱ्या नवीन-उल-हकने या सीझनमध्ये ८ सामन्यांत १९.९१ च्या सरासरीने ११ बळी घेतले आहेत. आरसीबीने १ मे रोजी लखनऊमध्ये एलएसजीचा पराभव केला आणि सामन्यादरम्यान नवीन आणि कोहलीमध्ये बाचाबाची झाली. ज्यात गंभीरही मध्ये पडला आणि वाद आणखीनच वाढत गेला होता.

एवढंच नव्हे तर नवीनने RCB च्या पुढच्या सामन्यांमध्ये सुद्धा अनेकदा विराटला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. विराट कोहलीच्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातून बाद झाल्यानंतर त्याच्या “गोड आंबे” पोस्टने बराच वाद निर्माण केला होता. आता पाहायला गेल्यास आरसीबी व एलएसजी दोन्ही संघ आयपीएलच्या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, कॅमरॉन ग्रीनची विकेट घेतल्यावर प्रत्येकवेळी नवीन उल हकने खोड काढून मैदानातच इशारा केल्याचे दिसून आले. के. एल. राहुलने शतकपूर्ण केल्यावर मैदानात कानात बोट घालून मग आपलीच कॉलर टाईट करत एक प्रतिकात्मक कृती केली होती. कालच्या सामन्यात नवीनने सुद्धा अशीच कृती करून मुंबई इंडियन्सला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. आता यावर लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी नवीनची चांगलीच शाळा घेतली आहे.

यंदाच्या आयपीएल सीझनमध्ये नवीन उल हक दमदार गोलंदाजीसह विराट कोहलीशी झालेल्या भांडणामुळे सुद्धा चर्चेत राहिला होता. आरसीबी आयपीएलमधून बाहेर पडेपर्यंत नवीन सतत विराटला डिवचत होता आणि आता कालच्या सामन्यात त्याने रोहित शर्मासह मुंबई इंडियन्सशी सुद्धा पंगा घेतल्याचे दिसून येत आहे.

“मागील काही काळात नवीनचे प्रेक्षकांशी चांगले समीकरण जुळलेले नाही. पण आता तुम्हाला विकेट मिळाली आहे तर तुम्ही कान बंद करण्यापेक्षा कधी नव्हे ते मिळणाऱ्या टाळ्या ऐकायला हव्यात.

जेव्हा एखादा खेळाडू शतक पूर्ण करतो तेव्हाही कान बंद करू नका, उलट कानाला हात लावून समोरच्यांना विचारा, हॅलो, आता मला तुमचा आवाज ऐकू येईल का? उत्साह आणि सेलिब्रेशन हे असे असायला हवे. आणि हो हे मी माझ्या वयानुसार सांगतोय”

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :