.. आणि लग्न घरी सर्वत्र पसरली शोककळा ! 

spot_img

... आणि लग्न घरी सर्वत्र पसरली शोककळा ! 

घरी लग्न समारंभ होता. यामुळे घरातील सर्वजण आनंदात गात आणि नाचत होते. यावेळी आरोपी तिनहा बेगाची पत्नी सनमतीबाईही सर्वांसोबत नाचत होती. सनमतीबाई आपल्या दिरांसोबत नाचत होती. पती तिनहा बेगाला ही गोष्ट आवडली नाही आणि हे पाहून तो संतापला.

यानंतर संतापलेल्या पतीने सर्वांसमोर पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने पत्नीवर चाकूने वार करून तिला जखमी केले. कसा तरी जीव वाचवून सनमतीबाई तिथून पळाली.

यानंतर तिनहा बेगा याने पत्नीसोबत नाचत असलेले दोघे भाऊ जगत बेगा आणि टिकू यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मोठा भाऊ मोहटू बेगा आणि मेहुणा सुखराम बेगा मदतीसाठी आले असता आरोपीने त्यांनाही काठीने मारहाण करून जखमी केले.

या घटनेमुळे लग्नघरात शोककळा पसरली. नातेवाईकांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तिनहा बेगाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. बिहारमध्ये ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :