गुजरात विधानसभेची निवडणूक आणि त्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीचे निकाल आता हळू हळू स्पष्ट होत आहेत. या निवडणुकीच्या आतापर्यंतच्या निकालांवरुन सत्ताधारी भाजप आघाडीवर आहे. काँग्रेस, आप या पक्षांची मोठी दमछाक झाल्याचंही या निवडणुकीत पहायला मिळतंय.
दरम्यान, या निवडणुकीत क्रिकेटर रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा उभी होती. जामनगर उत्तरमधून रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा जाडेजा विजयी झाली आहे. तिला 55 हजार 341 मतं मिळाली आहेत. त्यांनी आप आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा परभव केला. आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला केवळ 24 हजार 008 मते मिळाली.
रिवाबाने मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. जामनगर उत्तरमध्ये काँग्रेस, आप आणि भाजपा असा तिहेरी सामना होता. काँग्रेसने इथून बिपेंद्रसिंह जडेजा यांना तिकीट दिलं होतं.
इथून भाजपाने प्रसिद्ध क्रिकेटपटू जडेजाची पत्नी रिवाबाला उमेदवारी दिली होती. रिवाबाच्या प्रचारासाठी स्वत: रविंद्र जडेजा स्वत: मैदानात उतरला होता.
जामनगरच्या गल्लीबोळांत फिरुन त्यानं प्रचार केला. आज निकालाचा दिवस होता. जामनगरच्या मतमोजणीकडे सर्वांचच लक्ष होतं आणि रिवाबा रविंद्र जडेजाचा अनपेक्षित असा विजय झाला.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप झाले. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेनं देशाचं राजकारण ढवळून निघालं. या निवडणुकीत ‘आप’नं मात्र अजिबात आकांडतांडव केलं नाही, हे विशेष !