… आणि म्हणून त्यांना कदाचित त्रास होत असेल ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला !

spot_img

… आणि म्हणून त्यांना कदाचित त्रास होत असेल ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला !

दोन हजार रुपयांची नोट चलनबाह्य करण्यात येणार असल्याने या मुद्द्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. रिझर्व बँकेने घेतलेल्या या निर्णयाचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. वास्तविक पाहता या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. दिनांक 30 सप्टेंबर दोन हजार रुपयांच्या नोटा तुम्ही आम्ही बदलून घेऊ शकणार आहोत. मात्र या निर्णयावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दोन हजार रुपयांची नोट यापुढे छापणार नाही, असा निर्णय आरबीआयने घेतला. मात्र या निर्णयाचा विरोधकांवर मोठा परिणाम झाला आहे. कदाचित त्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या जास्तीत जास्त नोटा असतील आणि म्हणूनच त्यांना या निर्णयाचा त्रास झाला आहे, असा टोला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे.

पालघर येथे आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या वधूवरांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळी पत्रकाराचे संवाद साधताना त्यांनी विरोधकांना हा टोला लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, दोन हजार रुपयांची नोट यापुढे छापणार नाही, असा निर्णय आरबीआयचा आहे. हा निर्णय कुठल्या राजकीय पक्षाचा नाही. नोटबंदीसाठी आरबीआयने ठराविक मुदतदेखील दिलेली आहे. या नोटबंदीमुळे सामान्य ना कुठलाही त्रास होणार नाही. परंतू विरोधकांची आगपाखड ही केवळ व्यर्थ आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :