आणि बारामतीच्या ‘त्या’ सभेत प्रचंड हशा उसळला ! काय झालं, वाचा सविस्तर… !

spot_img

… आणि बारामतीच्या ‘त्या’ सभेत प्रचंड हशा उसळला ! काय झालं, वाचा सविस्तर… !

 

 

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा स्पष्ट आणि फटकळ बोलून मोकळं होण्याचा स्वभाव सर्वश्रुत आहे. पवार यांनी बारामतीकरांना आज कुटुंब नियोजनाचा मंत्र दिलाय.

 

 

आपल्या सूनेला आणि मुलीला केवळ दोन मुलांवरच थांबायला सांगा, दोन मुली झाल्या तरी तिसरं अपत्य ठेवू नका, असं सांगा. पोरंगच पाहिजे, वंशाचा दिवा पाहिजे, हा हट्ट धरू नका. मुलगीदेखील कर्तबगार असते. शरद पवार साहेब तर एकाच मुलीवर थांबले. त्यामुळे उगाच देवाची कृपा… देवाची कृपा… असं म्हणून उगी पलटण वाढवू नका, असा सल्ला अजित पवार यांनी दिला.

 

 

पवार यांच्या या सल्ल्यामुळे उपस्थितांमध्ये प्रचंड हशा उसळला. अजित पवार यांच्या हस्ते बारामतीत गरजू महिलांना स्वेटर, साडी आणि शिलाई मशिनचं वाटप करण्यात आलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हे आवाहन केलं.

 

 

ते म्हणाले, ‘एकच सांगतो, सूनबाई आली किंवा मुलीचं लग्न झालं, तर तिला म्हणा दोन अपत्यावरच थांब. बाकी काही. अजिबात वाढवा वाढवी करु नको, असं सांगा. दोन्ही मुली झाल्या तरी त्या सोन्यासारख्या आहेत, हे पटवून द्या’.

 

 

आता शरद पवार साहेब एकट्या सुप्रियावरच थांबले की नाही? सुप्रिया, पवार साहेबांचंच नाव काढते की नाही? पोरगंच पाहिजे, वंशाचा दिवाच पाहिजे, कशाचं काय अन् कशाचं काय? मुलगीदेखील कर्तबगार आहे. आम्ही अनुभवतो बाबांनो. त्यामुळे मर्यादित कुटुंब ठेवा’.

 

छोटं कुटुंब, सुखी कुटुंब. तुम्हालाही सर्व सुविधा मिळतील. नाही तर उगी पलटण चालूच आहे. चालूच आहे.. देवाची कृपा… देवाची कृपा…म्हणे देव वरनं देतोय. आम्हाला कळंना व्हयं कुणाची कृपा आहे ती. तसं काही होऊ देऊ नका. गंमतीचा भाग जाऊ द्या. पण कुटुंब मर्यादित ठेवण्याची गोष्ट लक्षात घ्या.

 

माझ्या बारामतीत कोणत्याही समाजाच्या व्यक्तीला सुरक्षित वाटलं पाहिजे. कुणाचेही लाड मी खपवून घेणार नाही. माझ्याजवळ बसणारा असेल आणि तो काही चुकत असेल तर त्याच्यावर कारवाई करा. कालही काही घटना घडली. या आधीही काही झालं. मी हे खपवून घेणार नाही. इथं प्रत्येकाला सुरक्षितच वाटलं पाहिजे.

 

 

अनेकजण चार पिढ्यांपासून आमच्यासोबत आहेत. कुणी चुकत असेल तर मी खपवून घेणार नाही. महिलाही सुरक्षित राहिल्या पाहिजेत. असं ते म्हणाले.

 

मध्यंतरी कुणी तरी तोडफोड केली. कोयता गँग का फोयता गँग. मला ते चालणार नाही. आपण परिवार म्हणून आधार देण्याचं काम करत असतो. काही वाटलं तर मला अधिकाराने सांगा.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :