लेटेस्ट न्यूज़अहिल्या नगर जिल्हा परिषदेत प्रशासनाची मनमानी; पात्र ठेकेदार कंपनीला डावलून अपात्र कंपनीला...

अहिल्या नगर जिल्हा परिषदेत प्रशासनाची मनमानी; पात्र ठेकेदार कंपनीला डावलून अपात्र कंपनीला दिलं काम…!

spot_img

अहिल्या नगर जिल्हा परिषदेत प्रशासनाची मनमानी; पात्र ठेकेदार कंपनीला डावलून अपात्र कंपनीला दिलं काम…!

महासत्ता भारत / अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्हा परिषदेत सध्या प्रशासक राज असून प्रशासकीय अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचे अनेक नमुने पाहायला मिळत आहेत. कनिष्ठ सहाय्यक या पदावर काम करणारे अधिकाऱ्याने केलेल्या मनमानी कारभाराचा नमुना नुकताच समोर आला आहे. जिल्हा परिषदेत कामे करण्यासाठी खरे पात्र आहेत, त्यांना डावलून जे अपात्र आहेत, त्यांना पात्र करून मर्जीतल्या ठेकेदार कंपनीला काम दिली जात आहेत. दुसरीकडे, श्री. गणेश सर्विसेस या फर्मची कागदपत्रं पूर्ण असताना सुद्धा समिती सदस्य व टेंडर क्लार्क यांनी या कंपनीला अपात्र केलं. अशी तक्रार विश्वास एंटरप्राइजस चे प्रोप्रा रोहित आव्हाड यांनी केली आहे.

संबंधितांकडून यावर हरकत घेण्यात आली आहे. दरम्यान, 2023 – 24 मध्ये सुद्धा संबंधित कंपनी अपात्र असताना आणि देण्यात आलेली कागदपत्रं पूर्ण नसताना देखील त्या ठेकेदार कंपनीला जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून पात्र करण्यात आले होते.

हा सारा प्रताप ज्या अधिकाऱ्याने केला आहे, त्या संबंधित कनिष्ठ सहाय्यक यांच्यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नक्की काय कारवाई करणार आहेत, याविषयी कर्मचारी व जनतेमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या मनमानीला विरोध करण्यासाठी लोकनियुक्त सदस्य नसल्यामुळे प्रशासकाची या जिल्हा परिषदेत मुजोरी वाढली असल्याचे यानिमित्ताने बोलले जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना (आदिवासी विकास विभाग) तसेच महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार; मंत्रिमंडळ निर्णय

अजित केसराळीकरांच्या मागणीला आले यश…. मंगळवार, दि. ३ जून २०२५ रोजी मंत्रिमंडळ निर्णय महाराष्ट्र राज्य अनुसूचित...

तब्बल ३३ वर्षांनंतर आमदार अमित गोरखे यांच्या निधीतून पिंपरी-भाटनागर येथील बौद्ध विहाराचे सुशोभीकरण…  नूतन धम्मविहाराचे उद्घाटन मंगलमय वातावरणात संपन्न..!

तब्बल ३३ वर्षांनंतर आमदार अमित गोरखे यांच्या निधीतून पिंपरी-भाटनागर येथील बौद्ध विहाराचे सुशोभीकरण...  नूतन...

2 दरोडे व 4 घरफोडीच्या गुन्हयात फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद… आरोपीकडून 1,19,000/-रू किं.मुद्देमालासह 5 घरफोडीच्या गुन्हयांची उकल!

2 दरोडे व 4 घरफोडीच्या गुन्हयात फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद... आरोपीकडून 1,19,000/-रू किं.मुद्देमालासह...

मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी…! निलंबित मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांची जिल्हा पोलीस अधीक्षक...

मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी...! निलंबित मनपा आरोग्य...