अहमदनगर सिटी सर्वेचा कारभार सुधारणार का ; कष्टकरी बळीराजाच्या व्यथा सरकारनं सोडवाव्यात !

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील / अहमदनगर

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांच्या हितासाठी कडक धोरणाची अंमलबजावणी करत असत. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालादेखील हात लावू नका, असे आदेश त्यांनी त्यांच्या अष्टप्रधान मंडळातल्या सर्वच कारभाऱ्यांना दिले होते. हल्ली मात्र छत्रपती शिवरायांच्या विचारानुसार कारभार करत असलेल्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या सुखदुःखाशी मुळीच देणे घेणे नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सध्याच्या या शिंदेशाही सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या अहमदनगरच्या सिटी सर्वेचा गेल्या अनेक वर्षांचा कारभार कष्टकरी बळीराजासाठी मोठी डोकेदुखी ठरत असून यामुळे नगर तालुक्यातला आणि जिल्ह्यातला शेतकरी प्रचंड वैतागला आहे सध्याच्या शिंदेशाही सरकारने या बळीराजाच्या व्यथा तातडीने सोडवाव्यात अशी अपेक्षा नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

या विभागातल्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या भाजीसह शेतकऱ्याची संपूर्ण शेतीच गिळंकृत करण्याला माफिया आणि त्यांच्या गुंडांना हातभार लावला आहे. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची अपेक्षा अहमदनगरच्या नागरिकांसह शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. या कार्यालयातल्या अधिकाऱ्यांच्या मनमानीच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे नगर तालुक्यातल्या अरणगावच्या कैलास उपाध्ये या शेतकऱ्यांचं उदाहरण खूप काही सांगून जातंय.

 

या कार्यालयातला एक मोजणी अधिकारी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची एकूण किंमत विचारतो आणि त्यातली निम्मी रक्कम आम्हाला द्या तरच तुमचं जमीन मोजणीचं काम होईल आणि आम्ही केलेली मोजणी हीच एकमेव प्रमाण आहे. त्याविषयी तुम्ही कुठे गेलात तरी काही फरक पडणार नाही, अशी मुजोरीची भाषा हा अधिकारी वापरत असल्याची गंभीर तक्रार कैलास उपाध्ये यांनी मध्यंतरी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन करताना केली आहे.

अरणगावच्या या शेतकऱ्याला हा मोजणी अधिकारी सरळ सरळ विचारतो, की तुझ्या जमिनीची मोजणी मी करून देतो. पण तु आम्हाला देऊन देऊन किती देशील? पाच लाख, सात लाख? त्याने काय ‘कात’
होणार आहे का? तुझ्या संपूर्ण जमिनीची किंमत किती? त्याच्या निम्मे रक्कम दे तरच तुझं काम होईल. विशेष म्हणजे हा अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून याच कार्यालयात नोकरी करत आहे. या अधिकाऱ्याला बदलीसाठी नियम लागू नाही का, अशी विचारणादेखील नगर तालुक्यातल्या शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :