नगर शहरातील आशा टॉकीज चौक येथे दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाले. त्यामुळे त्याठिकाणी तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती.
एक गट आशा टॉकीज चौक येथे एकत्रित झाला तर दुसरा गट माळीवाडा येथे बारा तोटी कारंजा येथे जमाव जमला होता.
या सर्व घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली तणाव निर्माण करणाऱ्या तरुणांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे.