अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी पण सध्या मुंबईत नियुक्तीस असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर काळाचा घाला; ड्युटीवर जाताना बसच्या धडकेत मृत्यू..! 

spot_img

अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी पण सध्या मुंबईत नियुक्तीस असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर काळाचा घाला; ड्युटीवर जाताना बसच्या धडकेत मृत्यू..! 

मुंबईतून एक दुखद वृत्त हाती आलं आहे. मुंबईत एका पोलीस अधिकाऱ्याच्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. प्रवीण दिनकर असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे.

पोलीस अधिकारी प्रवीण दिनकर हे सकाळी घरातून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे कामावर जाण्यासाठी निघाले होते. मुंबईच्या वाकोला – सांताक्रुज परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावर बसने दिलेल्या धडकेत ते रस्त्यावर कोसळून जखमी झाले.

त्यांना महापालिकेच्या सांताक्रुज येथील व्ही एन देसाई रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस अधिकारी प्रवीण दिनकर यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांच्या पाठीमागे आई, वडील, भाऊ, पत्नी, व दोन मुली असा परिवार आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :