असा आहे भारताचा ‘डिजिटल’ रुपया!

spot_img

परकीय चलनाचे व्यवहार करणार्‍या फाॅरेक्स ट्रेडिंग अर्थात फाॅरेन एक्स्चेंज ट्रेडिंग Foerx Exchnang Trading या व्यापारी चलनात क्रिप्टो करन्सी Cripto Curancy या चलनाचा बोलबाला होता. हे चलन भारतात अधिकृत आहे की नाही, याबद्दल वेगवेगळी मतमतांतरे आहेत.

जागतिक बाजाराच्या या शर्यतीत आपला भारत देशही आता मागे नाही. आपल्या देशानं डिजिटल रुपया काढलाय. दि. 1 डिसेंबर 2022 पासून देशातल्या चार शहरांमध्ये या डिजिटल रुपयाचा किरकोळ वापर सुरु झालाय. भारताचा हा डिजिटल रुपया कसा आहे, याविषयीची ही माहिती या लेखात वाचा…!

या डिजिटल (E-Rupee) रुपयाचे वितरण बँकांमार्फत होणार आहे. डिजिटल वॉलेटमध्ये हे पैसे जमा असणार आहेत. याद्वारे व्यक्ती ते व्यक्ती Person To Person किंवा व्यक्ती ते व्यापारी Person To Businessman असा डिजिटल व्यवहार करता येणार आहे.

ई रुपये E-Rupee चा वापर करण्यासाठी युजर्स हे मोबाईल फोन किंवा इतर उपकरणांद्वारे डिजिटल वॉलेटमधून डिजिटल रूपयाद्वारे व्यवहार करू शकणार आहेत. जर तुम्हाला दुकानदाराला डिजिटल स्वरूपात पैसे द्यायचे असल्यास तुम्हाला व्यापाऱ्याकडे असलेल्या QR कोडवर पेमेंट करता येणार आहे.

दरम्यान, डिजिटल रुपयाच्या किरकोळ वापरासाठीच्या पहिल्या पायलट चाचणीमध्ये दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि भुवनेश्वर या शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर भविष्यात अहमदाबाद, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंदूर, कोची, लखनौ, पाटणा आणि शिमला येथे ही सेवा सुरू होईल.

आरबीआय RBI च्या या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी 8 बँकांनी पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेचा सामावेश आहे. तर बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँकचा पुढच्या टप्प्यात समावेश होणार आहे.

सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातल्या चार बँका एसबीआय SBI, आयसीआयसीआय ICICI, Yes Bank येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट IDFC First सहभागी होतील.

सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) डिजिटल टोकनच्या स्वरूपात असेल. याला लिगल टेंडर म्हणून मान्यता देण्यात आली आहे. सध्या ज्या मूल्यांमध्ये कागदी चलन आणि नाणी जारी केली जातात, त्याच मूल्यांमध्ये डिजिटल रुपया जारी केला जाईल, असं आरबीआयने सांगितलंय.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :