अवैध वाळू वाहतुकीच्या डंपरसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त ; अहमदनगर एलसीबीची कारवाई !
श्रीरामपूर येथील अवैध वाळू वाहतुकीविरुध्द कारवाई करुन एक ढंपर व तीन ब्रास वाळू असा एकूण 10, लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अहमदनगरच्या स्थानिक
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केलाय.
अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि दिनेश आहेर (स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर) यांना जिल्ह्यातील अवैध वाळु उत्खनन/उपसा व वाहतुकी विरुध्द कारवाई करणे बाबतचे आदेश दिले होते. या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/मनोहर गोसावी, पोना/सचिन आडबल, संतोष लोढे, पोकॉ/जालिंदर माने, शिवाजी ढाकणे, रोहित येमुल असे श्रीरामपूर तालुक्यात अवैध धंद्याविरुध्द कारवाई करणे करीता पेट्रोलिंग करत होते.
दरम्यान, पोनि दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अर्जुन दाभाडे हा नायगांव ते श्रीरामपूर जाणारे रोडने, पांढरे-पिवळ्या रंगाचे ढंपरमधुन अवैध वाळु वाहतुक करीत आहे. आता गेल्यास मिळुन येईल, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/ आहेर यांनी सदर माहिती पथकास कळवून पंचांना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या.
या सुचने प्रमाणे पथकाने पंचांसह नायगांव ते श्रीरामपूर रोडने जावुन सापळा लावुन थांबलेले असतांना एक पांढरे-पिवळे रंगाचा ढंपर येताना दिसला पथकाची खात्री होताच चालकास बॅटरीच्या सहाय्याने थांबण्याचा इशारा करताच चालकाने वाहन थांबविले. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन वाहनाची पाहणी करता त्यामध्ये वाळु असल्याची खात्री झाल्याने सदर चालकास वाळु वाहतुकीचे परवान्या बाबत विचारणा केली असता त्याने त्याचेकडे शासनाचा वाळु उत्खनन/उपसा किंवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसलेबाबत सांगितले. त्यामुळे पथकाने त्यास ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नावे 1) विजय रावसाहेब लोंढे (वय 34, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर) असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे ढंपर मालका बाबत विचारपूस केली असता त्याने सदर ढंपर हा अर्जुन दाभाडे (रा. गोंधवणी, ता. श्रीरामपूर ) याच्या मालकीचा असुन त्याच्या सांगणेवरुन वाळु वाहतुक करीत असले बाबत माहिती दिली.
आरोपींनी अवैधरित्या शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता किंवा रॉयल्टी न भरता शासकिय मालकिची वाळु अवैध उत्खनन व चोरी करुन पर्यावरणाचे नुकसान होईल असे कृत्य केल्याने आरोपींना 10,30,000/- (दहा लाख तीस हजार) रुपये किंमतीचा पांढरा-पिवळा रंगाचा ढंपर व तीन ब्रास वाळुसह ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 183/2023 भादविक 379, 34 सह पर्यावरण कायदा कलम 3, 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व संदीप मिटके साहेब, उविपोअ, श्रीरामपूर विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.