शिषिरकुमार देशमुख (सहाय्यक पोलीस निरीक्षक, नगर तालूका पोलीस स्टेशन) यांनी नगर तालूका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी एक पोलीस पथक स्थापन केलं. पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पोउनि रणजित मराग, पोहेकॉ राहूल शिंदे, पोकों कमलेश पाथरुट, पोकॉ संदीप जाधव, पोकों खिळे, चापोहेकॉ इथापे यांच्या पथकाला अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे सोंग देशमुख यांनी आदेश दिले.
सदर आदेशान्वये सदर पथक नगर तालुका पोस्टे हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी पेट्रोलिंग करीत असतांना देशमुख (सहायक पोलीस निरीक्षक) यांना गुप्त बातमी मिळाली, वाटेफळ (ता. जि. अहमदनगर) गावच्या शिवारात निसर्ग हॉटेल येथे एक इसम बेकायदेशीर देशी व विदेशी दारुची मोठया प्रमाणात विक्री करीत आहे.
त्याचप्रमाणं रुईछत्तीसी गावामध्ये हॉर्टल दिपाली येथे सुध्दा देशी व विदेशी दारुची विक्री होत आहे. तेथे जावून कारवाई करा असा आदेश दिल्याने सदर पथकानं हॉटेल निसर्ग, वाटेफळ येथे जावून खात्री केली असता एक इसम विदेश दारुची विक्री करतांना दिसला.
सदर पथकाची व पंचाची खात्री पटताच विदेशी दारुची विक्री करण्याच्या इसमाला ताब्यात घेवून त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सचिन अशोक भवर (वय ३३ वर्षे रा. वाटेफळ ता. जि. अ. नगर) असे असल्याचे सांगितले. त्याची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या कब्जामध्ये एकूण ५ हजार १७५ रुपयांच्या विविध कंपनीच्या देशी व विदेश दारुच्या बाटल्या मिळून आल्या.
त्यानंतर नमूद पथक बातमीतील दुसऱ्या ठिकाणी रुईछत्तीसी गावामधील हॉटेल दिपाली येथे जावून खात्री केली असता त्याठिकाणी एक इसम देशी व विदेशी दारुची विक्री करताना दिसला पोलीसाची व पंचाची खात्री होताच सदर इसमास ताब्यात घेवून त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सोमनाथ सुनिल जगदाळे (वय २३ वर्षे रा. रुईछत्तीसी ता. जि. अ. नगर) असे असल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कब्जात एकुण ४ हजार ६५०/- रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
त्यानंतर पथक बातमीप्रामणे तिसऱ्या ठिकाणी निमगांव वाघा गावच्या शिवारात गेले असता तेथे एका घराच्या आडोशाला एक गावठी हातभट्टीचे रसायण व तयार हातभट्टीच्या एकुण ३४ हजार ५००/- मुद्देमाल असा एकुण ४४ हजार ३२५/- जप्त करण्यात आला.
सदर घटनेबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. सदरची कारवाई राकेश ओला (जिल्हा पोलीस अधीक्षक, अहमदनगर), प्रशांत खैरे (अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर), उपविभागीय पोलीस अधिकारी, अजित पाटील, सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोउनि युवराज चव्हाण, पोउनि रणजित मराग, पोहेकॉ / राहूल शिंदे, पोकों/कमलेश पाथरुट, पोकॉ संदीप जाधव, पोकों/खिळे, चपोहेकॉ / इथापे यांचे पथकाने केली.