अवकाळी’मुळे रस्त्यावर आलेल्या आदिवासी बांधवांची घरे तात्काळ उभी करा

spot_img

अवकाळी’मुळे रस्त्यावर आलेल्या आदिवासी बांधवांची घरे तात्काळ उभी करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना आदेश !

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिठामुळे मोठा फटका बसला आहे. यामध्ये वनकुटे (Vanakute) गावातल्या काही आदिवासी कुटुंबांची घर उद्ध्वस्त झाली आहेत. आदिवासी कुटूंबाना रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. पण या बांधवांची घर तात्काळ उभी करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या पारनेर तालुक्यात आले आहेत. यावेळी त्यांनी वनकुटे गावाला भेट दिली. अनेक माध्यमांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी तेथील पीक नुकसानीची आणि घर पडल्याची अनेक वृत्त दाखवण्यात आले होते. या वृत्ताची मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यादरम्यान दखल घेतली होती. तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना तातडीने त्या आदिवासी बांधवांची घर वादळी पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहेत ती दुरुस्त करावी आणि त्याचा तात्काळ अहवाल देण्याचे आदेश देण्यात यावे. यामुळे पीडित नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यामधील विविध भागांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड मोठ्या हेक्टरवर शेतीचे नुकसान झाले आहे. काल (दि. ११ )मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. तसेच तातडीने पंचनामे करण्याचे आदेशही सरकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनीदेखील तिथे झालेल्या अवकाळी पावसाची पाहणी केली आणि पंचनामे करणार असल्याचं सांगितलं. विदर्भामध्ये अवकाळी पावसामुळे ७,४०० हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :