अरे व्वा ! ‘या’ स्कुटरवर मिळतेय 48 हजार रुपयांची सबसिडी !

spot_img

अरे व्वा ! ‘या’ स्कुटरवर मिळतेय 48 हजार रुपयांची सबसिडी !

 

 

तुम्ही जर स्कुटर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर 48 हजार रुपयांच्या मोठ्या सबसिडीसह नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. या स्कूटरमध्ये तुम्हाला 115 किलोमीटरची रेंजदेखील मिळणार आहे.

 

 

केंद्र सरकार देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी FAME सबसिडी देत आहे आणि या सबसिडी अंतर्गत या स्कूटरवर 48 हजार रुपयांपर्यंत सबसिडी दिली जात आहे. या सबसिडीनंतर या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत खूपच कमी झाली आहे.

 

 

Begas D15 ही कंपनीची फ्लॅगशिप इलेक्ट्रिक स्कूटर आहे. कंपनीनं बाजारात दोन व्हेरियंट लॉन्च केले आहेत. या स्कूटरची किंमत 99 हजार 999 रुपयांपासून सुरु होते आणि त्याच्या टॉप मॉडेलमध्ये 1 लाख 14 हजार 999 रुपयांपर्यंत जाते.

 

या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये कंपनीने 3.2 kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे. यामध्ये 1.5 kW पॉवर असलेली इलेक्ट्रिक मोटर जोडण्यात आली आहे. या बॅटरीच्या चार्जिंगबाबत कंपनीचा दावा, आहे की ही बॅटरी 5 तास 30 मिनिटांत पूर्ण चार्ज होते.

 

 

एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर, ही इलेक्ट्रिक स्कूटर ताशी 60 किलोमीटरच्या टॉप स्पीडसह 115 किलोमीटरची रेंज देते. या स्कुटरच्या पुढील आणि मागील दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेक्स बसवले आहेत, ज्यामध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम उपलब्ध आहे.

 

 

या स्कुटरच्या सस्पेन्शन सिस्टीममध्ये समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस ड्युअल शॉक सस्पेंशन सेटअप समाविष्ट आहे. थ्री राइडिंग मोड, डिस्टन्स टू एम्प्टी फीचर, लिंप होम मोड, अँटी थेफ्ट अलार्म, जिओ फेन्सिंग, फाइंड माय व्हेईकल, रिमोट इमोबिलायझेशन यांसारखी फीचर्स यात उपलब्ध आहेत.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :