अरे या भामट्यानं संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनाच गंडवलंय ; बनावट कागदपत्र दाखवून काढल्या 46 कार्स !
भारतीय संरक्षण खात्यात ग्राहक काम करीत असल्याचे सांगून कंपनीतून तब्बल ४६ कार बाहेर काढल्या. त्या परस्पर दुसर्याला विकून त्यांची रक्कम कंपनीत जमा न करता कोट्यावधीची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे आरोपीने खडकी येथील सी एस डी डेपोचे क्षेत्रीय प्रबंधक यांच्या नावाने बनावट धनादेश तयार करुन फसवणूक (Fraud Case) केली आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी मोहन त्रिंबके यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police) फिर्याद (गु. रजि. नं. १७६/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी साई प्रविण नंजुन दप्पा Sai Pravin Nanjun Dappa (रा. धायरी) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार कात्रज बायपास रोडवरील (Katraj Bypass Road) ईशान्य ह्युंदाई मोटर्स येथे १३ मे २०२१ ते १७ डिसेबर २०२२ दरम्यान घडली आहे.
साई याला कंपनीने कारविक्रीबाबत काही अधिकार दिले होते. त्या अधिकाराचा गैरवापर करुन त्याने या काळात एकूण ४६ ग्राहक हे भारतीय संरक्षण खात्यात काम
करीत असल्याचे खोटे भासविले. त्यानंतर या ग्राहकांचे वाहन सोडण्याचे गेट पास बनवून त्यावर स्वत:ची सही
करुन कंपनीतील ४६ चारचाकी गाड्या बाहेर काढल्या.
त्या गाड्या खासगी व्यक्तींना परस्पर विक्री करुन ती रक्कम कंपनीत जमा न करता स्वत: स्वीकारुन कंपनीची
फसवणूक केली. त्यानंतर त्याने खडकी येथील सी एस डी डेपोचे क्षेत्रीय प्रबंधक यांच्या नावाने दोन बनावट चेक तयार करुन ते खरे आहेत, असे भासवून ते कंपनीत जमा केले. त्यानंतर तो फसवणूक करुन पळून गेला. पोलीस उपनिरीक्षक घोगरे तपास करीत आहेत.