अरे बापरे ! 67 व्या वर्षी ‘त्या’ला 12 बायका आणि 102 मुलं! आन् आता ‘तो’ म्हणतोय, ‘फॅमिली प्लॅनिंग’ करायचंय बुवा!

spot_img

अरे बापरे ! 67 व्या वर्षी ‘त्या’ला 12 बायका आणि 102 मुलं!

आन् आता ‘तो’ म्हणतोय, ‘फॅमिली प्लॅनिंग’ करायचंय बुवा!

एकापेक्षा जास्त बायका करण्याचा आपल्याला भारतात कायद्यानं मुभा नसली तरी युगांडा या देशात असं कुठलंही बंधन नाही. या देशातला एक 67 वर्षीय शेतकरी आहे, मोसेस हसहाया असं त्याचं नाव आहे. त्याला 12 बायका असून त्यांची 102 मुलं आहेत. त्यामुळे हे कुटूंब आहे, की एक गाव, असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. जाणून घेऊया, या आगळ्या वेगळ्या कुटुंबाविषयी…!

युगांडाचा मोसेस हसहाया हा शेतकरी त्याच्या मोठ्या कुटुंबासाठी जगभरात ओळखला जातो. त्यानं 67 वर्षांत 12 बायकांपासून 102 मुलं जन्माला घातली असून या शेतकर्‍याला तब्बल 568 नातवंडं आहेत.

आता इतकं झाल्यानंतर हा शेतकरी कुटुंब नियोजनाचा विचार करतोय. विशेष म्हणजे इतक्या मुलांना जन्म दिल्यानंतर आता मुसा पत्नींसाठी गर्भनिरोधक औषधांपासून ते वेगवेगळ्या पद्धतींचादेखील विचार करतो आहे.

आफ्रिकेतला हा शेतकरी आता त्याच्या कुटुंबावर मर्यादा घालण्याबद्दल विचार करतो आहे. एवढ्या मोठ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्याचं उत्पन्न कमी पडत आहे. त्यामुळे त्यानं आता कुटुंब नियोजन करण्याचा विचार केला आहे.

102 मुलांना जन्म दिल्यानंतर मुसाच्या लक्षात आलं, की जगण्याचा खर्च वर्षानुवर्षे वाढत आहे. शेती व्यवसायातून मिळणारे उत्पन्न कमी आहे. मुसाच्या मुलांपैकी एक तृतियांश मुले 6 ते 51 वयोगटातली आहेत. सर्व मुले त्याच्यासोबत शेतीची कामे करतात.

मुसाचा मोठा मुलगा मुसाच्या ११ व्या पत्नीपेक्षा 21 वर्षांनी मोठा आहे. गरिबीमुळे मुसाच्या 2 बायका त्याला सोडून गेल्या आणि आता उरलेल्या बायका गर्भनिरोधक गोळ्या वापरत आहेत. या शेतकर्‍याच्या या एवढ्या मोठ्या कुटुंबात भांडणं होत नसतील का, हादेखील एक प्रश्नच आहे बरं.

आता यावरुन तुमच्याही मनात असा दुसरा प्रश्न आलाच असेल, की यार, लोकसंख्यावाढीचा विचार फक्त आपण भारतियांनी आणि त्यातल्या त्यात हिंदुंनीच करायचा का? म्हणजे बाकीच्या जाती धर्मातल्या लोकांनी कितीही बायका करायच्या, त्यांना कितीही पोरं होऊ द्यायची, हा असा दुजाभाव का?

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :