अरे बापरे ! ‘या’ गुन्हेगारांनी काॅलेजमध्येच घेतलं घरफोडीचं ट्रेनिंग ?

spot_img

अरे बापरे ! ‘या’ गुन्हेगारांनी काॅलेजमध्येच घेतलं घरफोडीचं ट्रेनिंग ?

 

 

घरफोडी आणि चोरी करणाऱ्या एका संशयितांसह तीन अल्पवयीन मुलांना पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या पथकानं शिताफीनं ताब्यात घेतलं. काही दिवसांपूर्वी सामाडे येथे एकाच रात्रीत पाच ते सहा घरांना यांनी लक्ष केलं होतं.

 

या कारवाईमुळे सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांंचं तालुक्यात कौतूक केले जात आहे. या चोरीमुळं ग्रामस्थांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, कॉलेजचे शिक्षण घेत असतानाच स्वतःची हौस मौज व्हावी, आर्थिक समस्येवर सहजा सहजा मात करता यावी, यासाठी सदरच्या गुन्हेगारांनी घरफोडीचं अनधिकृत प्रशिक्षण घेतल्याचं पोलीस तपासादरम्यान स्पष्ट झालं.

 

 

धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुड, अप्पर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांनी सदर गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्यासंदर्भात सूचना केल्या.

सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी विशेष पथक तयार करून रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित रुपेश शशी पवार (वय १८ वर्षे) त्याच्या सोबत ३ अल्पवयीन बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतं होतं. त्यांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली.

 

 

या गुन्हेगारांकडून गुन्ह्यातला २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या गुन्हेगारांना धुळ्याच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. या गुन्ह्याच्या तपासामध्ये इतर मालमत्तांसह आणखी गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तविली.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :