अरेरे ! जेवणात केस निघाला आणि नराधम पतीने केलं ‘हे’ दुष्कृत्य!

spot_img

जेवणाच्या ताटात केस निघणं, हे काही मोठं घोर पाप नाही. किंवा मुद्दामहून कोणी जेवणाच्या ताटात टाकत नाही. मुळात स्वयंपाक तयार करताना ही चूक होऊ शकते. मात्र हा काही अक्षम्य अपराध नाही. पण काहींना हे अजिबात सहन होत नाही. तर काही ही चूक नजरेआडदेखील करतात.

उत्तरप्रदेशच्या Uttarpradesh पीलभित Pilbhit या भागात एका विवाहित महिलेबद्दल असंच काहीसं पण विचित्र घडलं. जेवणाच्या ताटात केस निघाल्यानं पीलभित भागातल्या एका नराधम पतीनं त्याच्या पत्नीचे हातपाय बांधून जबरदस्तीने तिच्याशी संबंध ठेवण्याचं दुष्कृत्य केलं. एवढंच नव्हे तर जेवणाच्या ताटाच केस निघाला म्हणून त्या नराधम पतीनं त्याच्या पत्नीच्या डोक्याचं अक्षरश: टक्कल केलं.

विशेष म्हणजे हे सारं होत असताना त्या विवाहितेच्या सासू आणि दिरानं नुसतीच गंमत पाहिली. दरम्यान, त्या विवाहितेने तिच्या माहेरच्यांना फोन करुन बोलवून घेतले. पण नराधम पतीनं त्यांनादेखील मारहाण केलं. हा नराधम पती सतत हुंड्याची मागणी करत असल्याचंही त्या विवाहित महिलेचं म्हणणं आहे.

या नीच आणि माणुसकीला काळिमा फासणार्‍या प्रकाराविरुध्द सदर विवाहितेसह तिच्या माहेरच्यांनी पोलीस ठाण्यात त्या नराधम पतीसह सासू आणि दिराविरुध्द शारिरीक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीनुसार संबंधितांविरुध्द गुन्हा दाखल केला.

आपल्या देशात विवाह हा अनेक संस्कारांपैकी एक पवित्र असा संस्कार मानला जातो. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं नातेवाईक, मित्र परिवाराच्या उपस्थितीत पार पडलेल्या या विवाह विधीनंतर पती – पत्नीनं एकमेकांचा आदर राखत संसार करायचा असतो. इथं मात्र हे न होता भयानक आणि राक्षसालाही लाज वाटेल, असं घाणेरडं दुष्कृत्य करण्यात आलंय.

विवाह म्हणजे आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याची यज्ञकुंडाच्या साक्षीनं घेतलेली शपथ. मात्र या विवाहात हुंडा मिळाला नाही म्हणून अनेक विवाहित महिलांचा अमानुष असा छळ केला जातो. या छळासा दुर्दैवानं तिच्या सासरची मंडळीही साथ देते.

या अशा भयानक कृत्याला भारतात तरी थारा दिला जात नाही. कारण असं करणार्‍याविरुध्द उशिरा का होईना पण गुन्हा दाखल केला जातो. जेवणाच्या ताटात केस निघाला म्हणून उत्तरप्रदेशात पीलभित याठिकाणी विवाहितेचा झालेला हा अमानुष छळ माणुसकीला कलंक मानला जात आहे. याप्रकरणी सर्वच संबंधितांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा यानिमित्तानं व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :