अमेरिकेत महिलांचा ‘टक्का’ वाढतोय ! शेकडो कंपनीमध्ये महिलाच आहेत बॉस !
अमेरिकेत America ४१ महिला फॉर्च्युन ५०० कंपन्यांमध्ये सर्वोच्च पदांवर आहेत. याआधी कधीच महिला एवढ्या संख्येत कंपन्यांच्या बॉस नव्हत्या. २०२१ मधील कमाईच्या बाबतीत अमेरिकेतली चौथी सर्वात मोठी कंपनी सीव्हीएस हेल्थ कॅरेन लिंच महिलेद्वारे चालवली जाणारी सर्वात मोठी कंपनी होती.
प्रथमच दोन कृष्णवर्णीय महिला वॉलग्रीन्स बूट्स अलायन्स फार्मास्युटिकल कंपनी आणि टीआयएए वित्तीय फर्म दोन दिग्गज कंपन्यांमध्ये सर्वोच्च पदांवर आहेत.
अमेरिका व इतरत्र व्यावसायिक जगात
महिला मोठी झेप घेत आहेत.
कंपन्यांच्या बोर्डात त्यांचा वाटा सर्वत्र वाढला. तथापि, स्वीडनमध्ये २०१९ नंतर घट झाली. नेदरलँड व जर्मनीत अनिवार्य कोटा लागू केल्यानंतर संचालकांसारख्या पदांवर महिलांची संख्या वाढली आहे. ब्रिटिश सरकारने निश्चित केलेल्या ऐच्छिक लक्ष्यांमुळे एफटीएसई १०० कंपन्यांच्या बोर्डवर महिलांची संख्या दहा वर्षांपूर्वीच्या १२.५% वरून ४०% झाली आहे.
असं असलं तरीही महिलांना पुरुषांच्या बरोबरीत येण्यासाठी अद्यापही मोठा पल्ला गाठायचा आहे. अमेरिकेत तीनपैकी दोन बोर्ड पोझिशन्स अद्याप पुरुषांकडे आहेत. दक्षिण कोरियात दहापैकी नऊ बोर्ड रूम जागा पुरुषांकडे आहेत.
श्रीमंत देशांतील शाळांत मुलांना मागे टाकणाऱ्या मुली पुरुष सहकाऱ्यांच्या तुलनेत कमी कमावतात. अमेरिकेत कृष्णवर्णीय स्त्रिया गोऱ्या स्त्रियांपेक्षा कमी कमावतात. वरिष्ठ पदांच्या बाबतीतही त्या मागे आहेत.