अमेरिकेत उसळला महागाईचा आगडोंब ; भारतीय वस्तूंना तिथं आहे बंदी ; दुबईहून येणाऱ्या वस्तू मिळताहेत चढ्या भावानं !
जगाच्या पाठीवर बलाढ्य देश अशी ख्याती असलेल्या अमेरिकेत सध्या महागाईचा आगडोंब उसळला पाहायला मिळत आहे. अमेरिकेत भारतीय वस्तूंना विशेषतः गव्हाला बंदी आहे. परिणामी अमेरिकेतल्या भारतियांवर गव्हाऐवजी दुबईहून येणारा मैदा खाऊन उदरनिर्वाह करावा लागत आहे.
अमेरिकेसारख्या प्रगतशील आणि जगात सर्वच बाबतीत बलाढ्य असल्याचा दावा करणाऱ्या देशात महागाईमुळे सामान्यांच्या समस्यांना सध्या तरी अंत दिसत नाही. या महागाईचा फटका मात्र अमेरिकेतल्या सामान्य जनतेला बसत आहे. या महागाईमुळे १३ किलो गव्हाच्या पिठाचं एक पाकीट तब्बल ४०० रुपयांना मिळते.
भारतात गव्हाची टंचाई निर्माण होऊ नये, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेत गव्हावर निर्यात बंदी केली आहे. मात्र गव्हावरची निर्यातबंदी उठवण्यात आली तर भारतीय शेतकऱ्यांचा आर्थिकदृष्ट्या चांगला फायदा होऊ शकतो. मात्र भारतातल्या गव्हावर बंदी असल्यानं अमेरिकेत जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा झाला आहे.
अमेरिकेच्या विविध भागांत भारतातले अनेक नागरिक नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्तानं राहत आहेत. त्यामुळे या महागाईचा गांभीर्याने विचार करुन मोदी सरकारने अमेरिकेत गव्हावरची निर्यातबंदी उठवावी, अशी अपेक्षा अमेरिकेत राहणारे भारतीय नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.