अमिताभ बच्चन यांच्या स्वागतासाठी चाहत्यांची धडपड; पण जया बच्चन असं का वागल्या!

spot_img

अमिताभ बच्चन यांच्या स्वागतासाठी चाहत्यांची धडपड; पण जया बच्चन असं का वागल्या!

 

 

बाॅलिवूडमध्ये Bolliwood पूर्वी ज्यांना ‘ॲंग्री यंग मॅन’ Angry Young Man आणि ‘सुपरस्टार’ Superstar म्हटलं जायचं, असे महानायक अमिताभ बच्चन Amitabh Bachhan हे स्वभावानं खूपच नम्र, मनमिळावू आणि चाहत्यांच्या भावना जपणारे अशा स्वभावाचे म्हणून सर्वांना परिचित आहेत.

 

 

मात्र त्यांच्या पत्नी जया बच्चन या तशा नाहीत. जया बच्चन यांनी अनेक वेळा फोटोग्राफर्स आणि पापाराझींचा सतत अपमान करत असतात. मुंबईतले हे पापाराझी स्टार कास्टची छायाचित्र काढून बाजारात विकून त्यावरच पोट भरतात. मात्र या पापाराझींशी जया बच्चन या नेहमी तुसड्या पद्धतीनं वागताना दिसताहेत.

 

 

अमिताभ आणि जया हे दोघे नुकतंच इंदूरला गेले होते. तिथल्या विमानतळावर हे दोघे जेव्हा उतरले, तेव्हा विमानतळावरच्या कर्मचार्‍यांनी त्यांच्या स्वागतासाठी तयारी केली.

 

 

यामध्ये अमिताभ बच्चन यांचे अनेक चाहतेदेखील होते. या सर्वांनी अमिताभ आणि जया यांचं फुलांचे गुच्छ देऊन स्वागत केलं आणि चाहत्यांनी फोटो घ्यायला सुरु केलं.

 

 

इतक्यात जया बच्चन त्या चाहत्यांवर खेकसल्या, ‘माझे फोटो नका घेऊ, ऐ, तुला इंग्रजीत सांगितलेलं समजत नाही का? फोटो नको घेऊ’. जया बच्चन यांचं हे रुप पाहून विमानतळावरचे सुरक्षा रक्षक चाहत्यांना फोटो न काढण्याची विनंती करु लागले.

 

 

यावेळी अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्याकडे बराचवेळ नुसतं पाहिलं आणि ते बाजूला निघून गेले. अमिताभ बच्चन यांच्यावर त्यांच्या चाहत्यांचं आजही प्रेम आहे. अमितजींचे फारसे चित्रपट न पाहिलेले नव्या पिढीतले चाहतेदेखील त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात. मात्र जया असं का वागतात, हा मोठा प्रश्न आहे.

 

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा ‘अभिमान’ हा चित्रपट त्यावेळी खूप गाजला होता. या चित्रपटात अमितजींनी एका प्रसिध्द गायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात जया बच्चन यांनी अमितजींच्या गृहिणी पत्नीची भूमिका केलीय.

 

या चित्रपटाच्या कथानकानुसार काही निर्माते त्या गायनाच्या शोमध्ये अमितजींऐवजी जया बच्चन यांच्याकडे गायनाचा आग्रह धरतात. मात्र जया नम्रपणे नकार देतात. पण अमितजींच्या आग्रहामुळे त्या तयार होतात. मात्र त्या अमितजींपेक्षा प्रसिध्द होतात. ते सहन न झाल्यानं अमितजी त्यांचा राग राग करतात.

 

अर्थात हे ‘अभिमान’ या चित्रपटाच्या कथानकापुरतं ठीक आहे. पण वास्तवात मात्र अमिताभ नम्र, प्रेमळ आणि जयाजी अमितजी आणि त्यांच्या चाहत्यांचा राग राग करताना दिसताहेत. त्यामुळे जयाजींचं वास्तवातलं वागणं अमितजींसह अनेकांना खटकतं.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :