अभिनेता सुशांत सिंह राजपूतनंतर अभिनेता आदित्य सिंह राजपूतचा संशयस्पद मृत्यू ; सिनेसृष्टीत माजली प्रचंड खळबळ !
काही दिवसांपूर्वी चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही तोच आता चित्रपट अभिनेता, मॉडेल आणि कास्टिंग दिग्दर्शक आदित्य सिंह राजपूत याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मुंबईतल्या अंधेरी भागात राहत्या घरी आदित्य सिंहाचा मृत्यू झाला. दिनांक 22 रोजी ही घटना घडली.
सुशांत सिंह राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूची खूप चर्चा झाली. सोशल मीडियावर देखील या घटने संदर्भात अनेक उलट सुलट चर्चांना उधान आलं होतं. मात्र ती चर्चा आता शांत होत नाही तोच आदित्यसिंह राजपूत यांच्या संशयास्पद मृत्यूच्या बातमी समोर आली आहे. या बातमीने सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.
आदित्यसिंह राजपूत याच्या मृत्यूचे कारण अद्याप जरी स्पष्ट झाले नसले तरी ड्रग्जचे अति सेवन केल्यामुळे हा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वॉचमनच्या मदतीने काही मित्रांनी आदित्यसिंह राजपूतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्याचा अहवाल आल्यानंतर आदित्य सिंह राजपूत यांच्या मृत्यू संदर्भात काही अपडेट्स पुढे येण्याची दाट शक्यता आहे.