अबब ! पुण्यात 1 हजार 744 मोबाईल टॉवर्स हे बेकायदेशीर ? ‘हे’ तर निष्क्रिय कारभाराचं ज्वलंत उदाहरण ! 

spot_img

अबब ! पुण्यात 1 हजार 744 मोबाईल टॉवर्स हे बेकायदेशीर ? ‘हे’ तर निष्क्रिय कारभाराचं ज्वलंत उदाहरण ! 

खरंच पुण्याबद्दल जे म्हटलं जातं, ‘पुणे तिथे काय उणे’ हे अजिबात खोटं नाही. कारण पुण्यात कुठल्याच गोष्टींची कमतरता नाही. पुणेकरांची विनोदबुद्धी, व्यवहारचातुर्य, हजरजबाबीपणा, मिश्किल स्वभाव हे सारं पुण्यात खचाखच भरलं आहे. इथं कशाचीच उणीव नाही.

IMG 20230407 WA0138

दरम्यान, पुण्यात मोबाईल टॉवर्सचीदेखील कमी नाही, हे नुकतंच उघडकीस आलंय. हे बेकायदेशीर मोबाईल टॉवर्स पुणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप घातक आहेत. या मोबाईल टॉवर्समुळे पुणेकरांचं आयुष्य कमी होत आहे.

पुणेकरांना हृदयविकाराचा धोका यामुळे वाढत आहे. हजारो मोबाईल टॉवर्स पुण्यासारख्या शहरात बेकायदेशीर असणं, हे पुणे महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराचं ज्वलंत उदाहरण आहे.

पुण्यातल्या टॉवर्ससंदर्भात ललित सत्यवान ससाने (रा. जवाहरलाल नेहरू रोड, न्यू टिंबर मार्केट, जय भवानी फर्निचर पुणे) यांनी दि. 27 फेब्रुवारी 2023 रोजी माहितीच्या अधिकारांतर्गत पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागात ऑनलाइन अर्ज केला होता.

ससाने यांनी पुण्यात महापालिका हद्दीत मोबाईल टॉवर उभारणी संदर्भात माहिती मागितली होती. त्यांच्या या माहिती अधिकाराच्या अर्जाला पुणे लेखी उत्तर दिलं आहे. महापालिकेनं यात म्हटलं आहे, की मोबाईल टॉवरच्या बांधकामादरम्यान मूलभूत सुविधांच्या मंजुरीसाठी 2 हजार 80 प्रस्ताव आले होते. यापैकी अनेक प्रस्तावांवर आक्षेप असल्याने ते फेटाळण्यात आले आहेत.

पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरात फक्त 284 टॉवर अधिकृत व बाकीचे 1 हजार 744 मोबाईल टॉवर हे अनधिकृत आहेत. यापैकी 61 मोबाईल टॉवर्सवर कारवाई करण्यात आले आहे.

पुण्यासारख्या गर्दीच्या ठिकाणी आणि गजबजलेल्या शहरात इतके मोबाईल टॉवर्स बेकायदेशीर असणं हे पुणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोठं घातक आहे. विशेष म्हणजे यापैकी फक्त 61 बेकायदेशीर मोबाईल टॉवर्स वरच महापालिकेने कारवाई केली आहे. त्यामुळे उर्वरित मोबाईल टॉवर्सवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी पुणेकरांमधून केली जात आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :