अबब ! पाकचा हा जबाबदार क्रिकेटर चांगलाच सापडलाय अडचणीत !

spot_img

अबब ! पाकचा हा जबाबदार क्रिकेटर चांगलाच सापडलाय अडचणीत !

 

 

पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. त्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओत तो त्याच्या सहकारी खेळाडूच्या प्रेयसीशी अश्लिल व्हिडीओ कॉल करत असल्याचा दावा करण्यात आलाय.

 

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या वनडे मालिकेत पाकिस्तान संघाला लाजिरवाणी हार पत्करावी लागली होती. या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ आणि कर्णधार बाबर आझमला सोशल मिडियावर तुफान ट्रोल केले जात आहे. त्यातच आता बाबर आझमचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे बाबर आझम वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

 

 

पाक कर्णधार बाबर आझम याचा वैयक्तिक व्हिडिओ ट्विटरवर एका युझरकडून शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये तो पाकिस्तानच्या संघातल्या खेळाडूंच्या प्रेयसींना त्याच्याशी संबंध ठेवण्यास सांगत आहे.

 

 

व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि फोटोंच्या दाव्यानुसार बाबर आझमचे इतर अनेक खेळाडूंच्या गर्लफ्रेंडसोबत अवैध संबंध आहेत. तसेच बाबर हा खेळाडूंच्या प्रेयसींना ‘ब्लॅकमेल’ करीत असून ‘तू माझ्याशी संबंध ठेवलास तर मी तुझ्या प्रियकराला संघातून काढून टाकणार नाही’, असे सांगत असल्याचा दावा करण्यात आलाय.

 

 

ट्विटरवर डॉ. निमो यादव या नावाच्या युझरने त्याच्या अधिकृत अकाऊंटवरून हा व्हिडिओ आणि फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत दिसणारी व्यक्ती ही बाबर आझम असून तो दुसऱ्या पाकिस्तानी क्रिकेटरच्या प्रेयसीसोबत चॅट करत असल्याचा सांगण्यात आलं आहे. परंतू बाबर आझम हा ‘हनी ट्रॅप’मध्ये फसला असून यातूनच त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, अद्यापपर्यंत बाबर आझम यानं याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :