अनैतिक संबंधावरुन प्रेयसीच्या पतीला धमकी ! यापुढे तिला काही बोलला तर माझ्याशी गाठ, तुम्हा सर्वांना ठार मारुन टाकीन; PSI वर गुन्हा दाखल; उपनिरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन, जाणून घ्या प्रकरण

spot_img

अनैतिक संबंधावरुन प्रेयसीच्या पतीला धमकी ! यापुढे तिला काही बोलला तर माझ्याशी गाठ, तुम्हा सर्वांना ठार मारुन टाकीन; PSI वर गुन्हा दाखल; उपनिरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन, जाणून घ्या प्रकरण

पुणे : – आपल्या अनैतिक संबंधावरुन प्रेयसीच्या घरात शिरुन तिच्या पतीला शिवीगाळ करुन कमरेच्या पिस्तुलाला हात लावून जीवे ठार मारण्याची धमकी पुणे शहर पोलिस दलातील (Pune City Police) एका पोलीस उपनिरीक्षकांनी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 

याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police Station) प्रविण नागेश जर्दे या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल केला आहे (PSI Pravin Nagesh Jarde). प्रविण जर्दे हा सध्या शिवाजीनगर कोर्ट आवार (Shivaji Nagar Court, Pune) येथे नियुक्तीला आहेत. कोथरुडमधील शास्त्रीनगर येथील एका सोसायटीत ही घटना १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता घडली होती. (Pune Crime News)

 

याप्रकरणी एका ४३ वर्षाच्या नागरिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ९६/२३) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक प्रविण जर्दे याचे फिर्यादी याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत.

तिने हे संबंध सोडून द्यावेत, यासाठी फिर्यादी तिला सांगत होते. तिने हे प्रविण जर्दे यांना सांगितले.

त्यावरुन प्रविण जर्दे त्यांच्या घरात शिरले आणि त्यांनी फिर्यादी, त्यांची आई व मुलांना शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली.

यापुढे तिला काही बोलला तर माझ्याशी गाठ आहे.

तसेच त्यांनी कमरेच्या पिस्तुलाला हात लावून तुम्हा सर्वांना ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली.

यामुळे फिर्यादी व त्यांच्या घरचे घाबरुन गेले होते. शेवटी त्यांनी हिंमत करुन पोलिसांकडे गेले.

कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, अप्पर आयुक्त प्रशासन डॉ. जालिंदर सुपेकर (Addl CP Dr. Jalindar Supekar)

यांनी पीएसआय जर्दे यांना पोलिस दलातून निलंबीत (PSI Pravin Jarde Suspended) केले आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :