विनयभंगाच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी काल परवा १५ हजारांची लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचार्याला बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर (Beed SP Nand Kumar Thakur) यांनी तडकाफडकी निलंबित (Police Officer Suspended) केलंय. (PSI And Police Personnel Suspended)
पोलीस उपनिरीक्षक राजू भानुदास गायकवाड PSI Raju Bhanudas Gaikwad (वय 53), पोलीस अंमलदार विकास सर्जेराव यमगर (Vikas Sarjerao Yamgar) असे निलंबित (Policemen Suspended) करण्यात आलेल्या दोन पोलिसांची नावे आहेत.
विनयभंगाच्या (Molestation Case) गुन्ह्यात मदत करण्यासाठी 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी 10 हजार रुपयांचा हप्ता स्विकारला. त्यानंतर उर्वरित 15 हजार रुपयांचा हप्ता स्विकारताना (Accepting Bribe) बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातल्या (Shivaji Nagar Police Station) पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्याला औरंगाबाद लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने (Aurangabad ACB Tap) सोमवारी (दि.5) सापळा रचून रंगेहाथ पकडले होते.
या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांच्यावर दाखल गुन्ह्यात मदत करून बी फायन पाठवण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक राजू गायकवाड व पोलीस अंमलदार विकास यमगर यांनी 30 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 25 हजार रुपये देण्याचे ठरले होते.
त्यापैकी तक्रारदार यांनी 10 हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला. उर्वरित 15 हजार रुपयांची मागणी गायकवाड आणि यमगर यांनी केली. तक्रारदार यांनी औरंगाबाद एसीबीकडे याबाबत तक्रार केली होती. त्यामुळे निलंबनाची ही कारवाई करण्यात आली.