अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने राज्याचे शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी‌

spot_img

महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान असलेल्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भिख मागून शाळा सुरू केल्याचे खोडसाळ,अपरिपक्व बालिश वक्तव्य विधान करुण महापुरुषांचे अपमान केले. या वक्तव्याच्या निषेधार्थ संघटनेमार्फत अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करून तीव्र निषेध नोंदविला.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषाबद्दल चुकीचे विधान करून समाजात असंतोष पसरविण्याचे काम केले आहे. महापुरुषाबद्दल आक्षेप घेणारे त्यांची बदनामी करणारे विधान केल्यानंतर देखिल त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई सुध्दा केली जात नाही.

भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा अ.भा.मे.स.संघठना व संपूर्ण दलित समाजाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनद्वारे देण्यात आले. असे निवेदन अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचे वतीने मा. जिल्हाधिकारी,मा.पोलिस अधिक्षक,यांना देण्यात आले.

या वेळी सामाजिक कार्यकर्ते रवि भैय्याजी मोरकरोसे,संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे, उपजिल्हाध्यक्ष, राहुल लखन, सामाजिक कार्यकर्ते संतोष सारसर,संघटनेचे कार्याध्यक्ष शुभम टाक,अनिल भालेराव,दिलिप सुर्यवंशी,पवन सेवक आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :