अकोल्यात लेकीच्या लग्नात नाचता-नाचता आईचा दुर्देवी मृ्त्यू,

spot_img

अकोल्यात लेकीच्या लग्नात नाचता-नाचता आईचा दुर्देवी मृ्त्यू, घटनेचा ह्रदयद्रावक व्हिडीओ समोर

 

अकोला : लग्नात अतिशय आनंदी आणि उत्साहाचं वातावरण असतं.सगळे लोक अगदी आनंदात नवरदेव-नवरीला त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत असतात.मात्र,कधीकधी या आनंदाच्या क्षणी असं काहीतरी घडतं की क्षणभरात हे वातावरण दुःखात बदलुन जातं.अकोला जिल्ह्यातुन असंच एक प्रकरण समोर आलं आहे.येथे आपल्या मुलीच्या लग्नात डान्स करत असतानाच आई कोसळली आणि तिना जीव सोडला.

 

या घटनेमुळे बघता बघता लग्नाचा आनंद दुःखात बदलला.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला.दुसरीकडे या घटनेनंतरही ठरलेल्या दिवशीच विवाहसोहळा करण्याचा निर्णय घेण्यात आला.वधुच्या नातेवाईकांनी हल्द्वानी येथे जाऊन शोकाकुल वातावरणात लग्न पार पाडलं.यावेळी वधुच्या मामाकडून कन्यादान करण्यात आलं.

 

मिळालेल्या माहितीनुसार,अकोल्यातील गणेश हॉलमध्ये रविवारी एका तरुणीचं लग्न होतं.विवाह सोहळा पार पाडण्यासाठी वधुपक्षातील लोकांना अकोट येथे जावे लागले.याआधी मुलीच्या मेहेंदी आणि हळदीसह सर्व विधी तिच्या घरी केले जात होते.विधी दरम्यान लोक रात्री उशिरा नाचत होते.त्यावेळी वधुच्या वडिलांसह आई आणि नातेवाईकांनी जोरदार डान्स केला.

 

दरम्यान,नवरीची आई नाचत असताना जाग्यावर पडते.घाईघाईत त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं,तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.या घटनेमुळे विवाहितेच्या घरात शोककळा पसरली.लेकीचे हात पिवळे होण्याच्या काही तास आधीच आईचा मृत्यू झाला.आईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :